औरंगाबाद पोलिसांनी आरोपांची हवाच काढली

शिवसेनेचे आमदार आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर मंगळवारी दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती. परंतु आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आला नाही. असा दावा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केला आहे. हा दावा औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार यांनी केला आहे. औरंगाबादच्या महालगावातील कार्यक्रमात गोंधळ उडाला असल्याची घटना समोर आल्याने […]

औरंगाबाद पोलिसांनी आरोपांची हवाच काढली

शिवसेनेचे आमदार आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर मंगळवारी दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती. परंतु आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आला नाही. असा दावा औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केला आहे. हा दावा औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार यांनी केला आहे.

औरंगाबादच्या महालगावातील कार्यक्रमात गोंधळ उडाला असल्याची घटना समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. पण आदित्य अथवा विधान अंबादास दानवे यांच्या गाडीवर एकही दगड फेकला गेला नाही, थोडा गोंधळ झाला पण दगडफेक झाली नाही, अशी माहिती औरंगाबाद ग्रामीणचे ॲडिशनल एसपी सुनिल लांजेवार यांनी दिली आहे.

काल आदित्य ठाकरे यांची सभा मालगाव या ठिकाणी होती. त्या ठिकाणी त्यांचा ताफा तिथून निघत असताना गोंधळजन्य परिस्थिती होती. एक कॅमेरामन होते ते किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु जो दावा करण्यात आला आहे. तो दावा खोटा आहे. इथे कोणतीही दगडफेक झालेली नाही. कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडलेला नाही. सभेदरम्यानदेखील दगडफेक झालेला नाही. सभा सुरळीतपणे पार पडली. सभा झाल्यानंतर दोघेही सुखरुप बाहेर पडले. प्राथमिक चौकशीनुसार एकही दगड गाडीवर फेकण्यात आलेला नाही. असे पोलीस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number