आदित्य ठाकरे हे सोमवारपासून नाशिक दौऱ्यावर आले आहेत. मात्र, शिंदे गटाने नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटातील ५० शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.
ठाकरे गटातील नेते नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचे सोहळे होत आहेत. यापूर्वी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले असताना ठाकरे गटातून महत्त्वाचे नेते शिंदे गटात गेले होते. आता आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर ५० हून अधिक शिवसैनिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. पक्ष सावरण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न होत असताना ठाकरे गटातून अनेकजण शिंदे गटात प्रवेश करत असल्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त नाशिकसह औरंगाबादचा दौरा करणार आहेत. अशातच ठाकरे गटातून पन्नासहून अधिक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे. एकीकडे आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेला उभारी देण्यासाठी संवाद दौरे, मेळावे घेत आहेत. तर दुसरीकडे त्याच वेळेस शिंदे गटात प्रवेश करण्याची संख्यादेखील वाढत आहे.