युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आता सुरु होत आहे. 6 फेब्रुवारी यात्रेला सुरुवात होत आहे. आदित्य ठाकरेंचा शिवसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकपासून होत असून आज आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांची शिवसंवाद यात्रा नाशिक, जालना, बीड, संभाजीनगरमध्ये होणार आहे.
दरम्यान आज युवा नेते आदित्य ठाकरे इगतपुरी आणि सिन्नर मध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम तर संध्याकाळी नाशिकच्या देवळाली मध्ये जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले होते. त्यात आता सातव्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.