पाकिस्तानच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्तानात गंभीर ऊर्जा संकटाबरोबरच खाद्यपदार्थ देखील महागले आहेत. वास्तविक आधीपासून आर्थिक संकटाला ताेंड देणाऱ्या जनतेसमाेर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. अलीकडेच मंत्रिमंडळाची बैठकदेखील अंधारात झाली होती. तसेच सामान्य पीठ, तेल, कांदा आणि डाळी यांसारख्या खाद्यपदार्थांचे दर देखील गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानातील 15 किलोच्या पिठाच्या पॅकेटची किंमत 3000 रुपयांच्या पुढे गेली आहे. खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्यांना हे परवडत नाही आहे.
पाकिस्तानच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.पाकिस्तानमध्ये खाण्यापिण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानवरील वाढते कर्ज, पेट्रोल-डिझेल आणि विजेच्या वाढत्या किमती, घटत चाललेला परकीय चलन साठा, जागतिक चलनवाढ, राजकीय अस्थिरता आणि जीडीपीच्या वाढीतील मंदी या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी पाकिस्तानला कठोर संघर्ष करावा लागत आहे.