‘सत्ता डोक्यात जाऊ देऊ नका’

शरद पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.  त्यावेळी ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपावर बोलण्याचे पवार यांनी टाळले. तुरुंगात टाकण्याची भाषा चुकीचे असे शरद पवार यांनी सांगितले. नारायण राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला होता. त्यावर संजय राऊत […]

‘सत्ता डोक्यात जाऊ देऊ नका’

शरद पवार हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.  त्यावेळी ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपावर बोलण्याचे पवार यांनी टाळले. तुरुंगात टाकण्याची भाषा चुकीचे असे शरद पवार यांनी सांगितले. नारायण राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.

त्यावेळी शरद पवार म्हणाले, सतत चर्चेत असणारे हे पहिले राज्यपाल आहेत, त्यांच्या वक्तव्यांबाबत सतत नाराजी व्यक्त करावी लागत आहे हे योग्य नाही. राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा राखावी असा सल्ला शरद पवारांनी दिला. पहिले असे राज्यपाल आहेत की सतत त्यांच्यावर टीका होत आहे. जनता त्यांच्यावर टीका करत आहे.

महाराष्ट्रात एक चांगली परंपरा आहे. राज्यात अनेक चांगले राज्यपाल आले. जे राज्यपाल महाराष्ट्रात आले पक्ष कोणताही असो पण त्यांनी राज्याच्या हिताच्या गोष्टी मांडल्या. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्ता हातात असताना जमिनीवर पाय ठेऊन काम करायचे असते.

मात्र, अलिकडच्या काळात सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकडून चुकीची भाषा केली जात आहे. हे राजकीय नेत्यांचे काम नाही. त्यांच्याकडून इतरांना तुरुंगात डांबण्याची भाषा केली जात आहे, हे चुकीचे आहे. जरी शिवसेनेत दोन गट पडले असले तरी कडवा शिवसैनिक हा प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहे. तो कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला याचा फायदाच होणार आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशाराही दिला. काही आमदार खासदार इकडून तिकडे गेले असतील. पण आता येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या भावना लक्षात येतील, असेही शरद पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number