‘सत्य झुकेगा नही!’

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज ईडीसमोर आपला जबाब नोंदवणार आहेत. या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. […]

‘सत्य झुकेगा नही!’

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज ईडीसमोर आपला जबाब नोंदवणार आहेत. या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर ‘सत्य झुकेगा नही’! असं लिहलं आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होण्याच्या आधी, काँग्रेसनं रविवारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर सूडाच्या राजकारणाचा आरोप केला. आज ‘नॅशनल हेराल्ड-असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ डीलशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी ईडीसमोर हजर झाले आहेत. अशा परिस्थितीत पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि खासदार दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयावर निषेध मोर्चा काढून ‘सत्याग्रह’ करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. राज्यातील काँग्रेस नेतेही सोमवारी तपास यंत्रणेच्या कार्यालयांवर मोर्चा काढून ‘सत्याग्रह’ करणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number