शुक्रवारी पंडितांचे पुन्हा स्थलांतर

काश्मीर खोऱ्यातून रात्री उशिरा मोठ्या संख्येने  काश्मिरी पंडित आणि कर्मचारी जम्मूला पोहोचले. यावेळी त्यांनी सरकारकडे संरक्षणाची मागणी केली. जम्मू-काश्मीरमध्ये १२ तासांत दहशतवाद्यांनी २ गैर-काश्मीरींची गोळ्या मारून हत्या केली. ज्यामध्ये बिहारचा रहिवासी दिलखुश कुमारचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एकजण जखमी झाला आहे. दुसरीकडे गुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली. आतापर्यंत एकूण ४ […]

शुक्रवारी पंडितांचे पुन्हा स्थलांतर

काश्मीर खोऱ्यातून रात्री उशिरा मोठ्या संख्येने  काश्मिरी पंडित आणि कर्मचारी जम्मूला पोहोचले. यावेळी त्यांनी सरकारकडे संरक्षणाची मागणी केली. जम्मू-काश्मीरमध्ये १२ तासांत दहशतवाद्यांनी २ गैर-काश्मीरींची गोळ्या मारून हत्या केली. ज्यामध्ये बिहारचा रहिवासी दिलखुश कुमारचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एकजण जखमी झाला आहे. दुसरीकडे गुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली.

आतापर्यंत एकूण ४ हत्या झाल्याचे समजते. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरी पंडितांचे पुन्हा एकदा स्थलांतर पाहायला मिळत आहे. काश्मीर खोर्‍यातून गुरुवारी रात्री उशिरा मोठ्या संख्येने कर्मचारी जम्मूला पोहोचले. काश्मिरी पंडित आणि कर्मचाऱ्यांनी सरकारकडे संरक्षणाची मागणी केली. दुसरीकडे, काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या वाढत्या घटनांनंतर काश्मिरी पंडितांची मागणी लक्षात घेऊन खीर भवानी यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती बिघडत चालली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीएम पॅकेज अंतर्गत कर्मचारी अमित कौल यांनी सांगितले की, परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. पुन्हा ४ हत्या झाल्या आहेत. 30-40 कुटुंबे शहर सोडून गेली आहेत. आमची मागणी पूर्ण झाली नाही. त्यांची (सरकारची) सुरक्षित ठिकाणे फक्त शहरात आहेत, श्रीनगरमध्ये सुरक्षित जागा उपलब्ध नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number