‘मुंबई विद्यापीठास संभाजी महाराजांचे नाव द्यावे’

छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव मुंबई विद्यापीठास द्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरे यांनी केली आहे. छञपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ शरद गोरे यांनी मराठी भाषेत काव्य […]

‘मुंबई विद्यापीठास संभाजी महाराजांचे नाव द्यावे’

छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव मुंबई विद्यापीठास द्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरे यांनी केली आहे. छञपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ शरद गोरे यांनी मराठी भाषेत काव्य अनुवादित केला आहे. लढवय्ये, प्रराक्रमी, अजिंक्य आणि अव्दितीय ,बहूभाषिक, बुधभूषण, नायिकाभेद, सातशतक, नखशिख, या सारखे चार ग्रंथाचे लेखन करून संपर्ण जगाचा विचार करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव मुंबई विद्यापीठास द्यावे अशी मागणी केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासावर नवीन संशोधन करण्याकरिता आणि त्यांनी लिहलेल्या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाने ग्रंथ समिती स्थापन करावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या महापुरूषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराज यांचा तात्काळ समावेश करावा. साहित्य क्षेत्रातील अमूल्य  योगदानासाठी त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा. १४ मे रोजी छञपती संभाजी महाराज यांची जयंती आहे, त्या निमित्ताने या मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number