वाढत्या तापमानामुळे संत्र्यावर संकट

मागील काही वर्षापासुन तालुक्यातील संत्री उत्पादक शेतकरी कधी अवकाळी, गारपीट तर कधी व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीला बळी पडत आहेत. कोरोनामुळे देखील मागील 2 वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. त्यातच यंदा पोषक वातावरण असल्यामुळे संत्रा बागा मोहरून गेल्या होत्या. परंतु मागील काही दिवसापासुन सुर्य आग ओकत असल्यामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे आंबिया बहराची फळे गळत आहेत. त्यामुळे शेतकरी […]

वाढत्या तापमानामुळे संत्र्यावर संकट

मागील काही वर्षापासुन तालुक्यातील संत्री उत्पादक शेतकरी कधी अवकाळी, गारपीट तर कधी व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीला बळी पडत आहेत. कोरोनामुळे देखील मागील 2 वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. त्यातच यंदा पोषक वातावरण असल्यामुळे संत्रा बागा मोहरून गेल्या होत्या. परंतु मागील काही दिवसापासुन सुर्य आग ओकत असल्यामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे आंबिया बहराची फळे गळत आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

पारंपारिक शेतीतून उत्पादन खर्च सुद्धा निघणे अवघड झाल्याने बहुतांश शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. जिल्यात जवळपास ६९ हजार हेक्टरवर संत्रा लागवड आहे. यापैकी ४० हजार हेक्टरवर आंबिया बहार आहे.  आग ओकणाऱ्या उन्हाचा फटका संत्र्याच्या बहराला बसला आहे. ४४ डिग्री तापमानामुळे आंबिया बहार गळून गेला आहे.

तसेच अती पानगळ झाल्याने संत्री उत्पादकांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात संत्री बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. या संत्री बागांवर आंबिया बहर असताना अचानक तापमानात वाढ झाली. संत्री झाडावर अनेक रोगाने आक्रमण केल्याने संत्री झाडांवरील आंबिया बहाराला मोठ्या प्रमाणात गळती लागली. त्यामुळे संत्री बागेचं आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी या संत्री गळती मुळे मोठ्या संकटात सापडला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number