राज यांनी राजद्रोह केला ?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मांगणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आली. महाराष्ट्रासोबतच देशभरातील मशिदींवरील भोग्यांवरून राज्य सरकारला थेट आव्हान दिल्याचा दावा करण्यात आला. हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. हेमंत पाटील हे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष आहे. गुढी पाडव्याच्या […]

राज यांनी राजद्रोह केला ?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मांगणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आली. महाराष्ट्रासोबतच देशभरातील मशिदींवरील भोग्यांवरून राज्य सरकारला थेट आव्हान दिल्याचा दावा करण्यात आला.
हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. हेमंत पाटील हे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष आहे. गुढी पाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळावरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत धार्मिकस्थळांवरील भोंग्याच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी ठाणे आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी सभा घेत आपली भूमिका आक्रमतेनं भाषणातून मांडली.

मशिदीवरील भोंग्यातून होणारी अजान थांबवा अन्यथा दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवू ही भूमिका घेण्यात आली होती. औरंगाबाद येथील सभेनंतर राज ठाकरे यांच्या विरोधात कमल १५३, ११६, ११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे वकील आर.एन.कछवे यांच्यामार्फत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेनुसार  राज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसंच राज ठाकरे यांचे राजकीय दौरे, पत्रकार परिषदा आणि विविध शहरात कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या दौऱ्यांवर काहीकाळापूरती बंदी घालण्याची मागणी करण्यात आलीय आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number