मंत्रालयात मराठा क्रांती ठोक मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाने मंत्रालयात बुधवारी ठिय्या आंदोलन केले आहे. मराठा क्रांती विद्यार्थ्यांनी मंत्रालयात मोर्चा नेला असून जोपर्यंत भेटीसाठी मुख्यमंत्री येत नाहीत तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे. सरकारनं ‘संभाजीराजेंना दिलेल्या आश्वासनाचा पाठपुरवठा केला नाही’ म्हणून हा मोर्चा काढला असल्याचे समन्वयकांचे म्हणणे आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक ‘मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावा’ असं म्हणत आहेत. […]

मंत्रालयात मराठा क्रांती ठोक मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाने मंत्रालयात बुधवारी ठिय्या आंदोलन केले आहे. मराठा क्रांती विद्यार्थ्यांनी मंत्रालयात मोर्चा नेला असून जोपर्यंत भेटीसाठी मुख्यमंत्री येत नाहीत तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे. सरकारनं ‘संभाजीराजेंना दिलेल्या आश्वासनाचा पाठपुरवठा केला नाही’ म्हणून हा मोर्चा काढला असल्याचे समन्वयकांचे म्हणणे आहे.

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक ‘मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावा’ असं म्हणत आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीसाठी येत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील असा इशारा मोर्चाच्या समन्वयक तसेच विद्यार्थ्यांनी दिला आहे.  तर, याप्रकरणी ‘मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी चर्चा करु’ असं आश्वासन अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे. मात्र, आंदोलनकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर ठाम आहेत.

काही दिवसांपूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन केले होते. या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं होत मात्र त्याची पूर्तता झाली नाही. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मराठा मोर्चाचे समन्वयक विद्यार्थी मंत्रालयात आले होते. मात्र अधिकाऱ्यांकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी मंत्रालयातच ठिय्या आंदोलन केले आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी याविषयी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करू अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अडून आहेत. मुख्यमंत्री भेटीसाठी येत नाहीत तोवर आंदोलन संपणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number