यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर

यवतमाळ, दि. 4 : जिल्ह्यात गत 24 तासात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 175 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात एका मृत्युसह 161 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळातील […]

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर

यवतमाळ, दि. 4 : जिल्ह्यात गत 24 तासात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 175 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात एका मृत्युसह 161 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 161 जणांमध्ये 89 पुरुष आणि 72 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळातील 89, महागाव 12, पांढरकवडा 9, पुसद 9, दारव्हा 8, नेर 8, आर्णि 7, वणी 3, बाभुळगाव 3, झरीजामणी 3, मारेगाव 3, दिग्रस 2, घाटंजी 1, राळेगाव 1, उमरखेड 1 आणि इतर 2 रुग्ण आहे.

गुरुवारी एकूण 1213 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 161 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1052 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1726 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 18402 झाली आहे. 24 तासात 175 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16206 आहे. तर जिल्ह्यात एकूण 470 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 167705 नमुने पाठविले असून यापैकी 166358 प्राप्त तर 1347 अप्राप्त आहेत. तसेच 147956 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number