यवतमाळ जिल्ह्यात तिघांचा मृत्यु ; 40 जण नव्याने पॉझेटिव्ह 52 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात 24 तासात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 40 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 52 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृतकांमध्ये यवमताळ शहरातील 67 व 76 वर्षीय महिला […]

यवतमाळ जिल्ह्यात तिघांचा मृत्यु ; 40 जण नव्याने पॉझेटिव्ह 52 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात 24 तासात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 40 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 52 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

मृतकांमध्ये यवमताळ शहरातील 67 व 76 वर्षीय महिला आणि पुसद शहरातील 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 959 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 40 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 919 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 265 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10961 झाली आहे. 24 तासात 52 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10276 आहे. तर जिल्ह्यात एकूण 362 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 99829 नमुने पाठविले असून यापैकी 98930 प्राप्त तर 899 अप्राप्त आहेत. तसेच 87969 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number