Xiaomi Mijia Air Fryer: हायटेक कुकिंगचा अनुभव; शाओमीचा 6.5 लिटरचा नवा एअर फ्रायर लाँच, व्हॉइस असिस्टंटने होणार नियंत्रण

या डिव्हाइसला 900W स्टीम जनरेटर देण्यात आला असून तो 130 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गाठू शकतो, त्यामुळे अन्न पटकन शिजते.

Xiaomi Mijia Air Fryer: हायटेक कुकिंगचा अनुभव; शाओमीचा 6.5 लिटरचा नवा एअर फ्रायर लाँच, व्हॉइस असिस्टंटने होणार नियंत्रण

शाओमीने Youpin प्लॅटफॉर्मवर नवीन Xiaomi Mijia Smart Air Fryer Pro बाजारात सादर केला आहे. घरगुती स्वयंपाक अधिक सोपा, स्मार्ट आणि आरोग्यदायी करण्याच्या उद्देशाने हे उपकरण विकसित करण्यात आले आहे. या एअर फ्रायरमध्ये टिकाऊपणा आणि स्वच्छता लक्षात घेऊन 304 स्टेनलेस स्टीलची इनर कॅव्हिटी देण्यात आली आहे. तसेच कुकिंग बास्केटमध्ये फ्लोरीन-फ्री नॉन-स्टिक कोटिंग वापरले असल्यामुळे स्वयंपाकानंतर साफसफाई करणेही सोपे होते.

क्षमता आणि डिझाइन

या एअर फ्रायरमध्ये 6.5 लिटरची मोठी क्षमता देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण कुटुंबासाठी अन्न तयार करणे शक्य होते. यात ड्युअल-लेयर रॅक डिझाइन दिले असून एकाच वेळी दोन प्रकारचे पदार्थ तयार करता येतात. या उपकरणाची अंतर्गत रुंदी 234 मिमी आहे, ज्यामध्ये एक पूर्ण चिकन, 24 चिकन विंग्स, 800 ग्रॅम फ्राईज किंवा नऊ स्टीम्ड बन सहज ठेवता येतात.

कुकिंग फीचर्स आणि तंत्रज्ञान

या डिव्हाइसला 900W स्टीम जनरेटर देण्यात आला असून तो 130 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गाठू शकतो, त्यामुळे अन्न पटकन शिजते. यात स्टीम, स्टीम-फ्राय आणि कमी तापमानावर शिजवण्यासह एकूण 11 कुकिंग मोड्स उपलब्ध आहेत. याशिवाय 31 प्रीसेट रेसिपीज देण्यात आल्या असून Mi Home ॲपच्या माध्यमातून 100 हून अधिक क्लाउड-बेस्ड रेसिपीजही वापरता येतात.

हेही वाचा: All Party Meeting: मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये; इराण-इस्रायल संघर्षावर चर्चेसाठी महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक आयोजित

किंमत किती?

Xiaomi Mijia Smart Air Fryer Pro ची किंमत 559 युआन म्हणजेच सुमारे 7505 रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने विविध पदार्थ तयार करण्यासाठी स्मार्ट फंक्शन, सोय आणि बहुपयोगी डिझाइन यांचा संगम या उपकरणात करण्यात आला आहे.

सुरक्षितता आणि वापरातील सोय

या एअर फ्रायरमध्ये 1.5 लिटरचा पाण्याचा टँक दिला आहे, ज्यामुळे दीर्घकाळ स्टीम कुकिंग करता येते. पुन्हा पाणी भरावे लागणार नाही अशा पद्धतीने सलग सात प्रकारचे पदार्थ बनवता येतात. त्याचबरोबर 30 ते 230 अंश सेल्सिअसपर्यंत अचूक तापमान नियंत्रण आणि 360 डिग्री हॉट एअर सिस्टममुळे अन्न बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ राहते.

याशिवाय हे उपकरण रोटरी नॉब किंवा Mi Home ॲपद्वारे नियंत्रित करता येते. HyperOS Connect सपोर्टसह XiaoAI व्हॉइस असिस्टंटची सुविधा देखील देण्यात आली आहे. यामध्ये व्हिजिबल कुकिंग विंडो, बास्केट काढल्यावर ऑटोमॅटिक पॉवर ऑफ, ड्रायिंग मोड, डीओडोरायझेशन फंक्शन आणि अन्न 30 मिनिटांपर्यंत गरम ठेवण्याची सुविधा अशा अनेक उपयुक्त वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: Protein Supplements: सावधान! बॉडी बनवण्याच्या नादात लिव्हर आणि किडनी धोक्यात? प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी 'हा' इशारा नक्की वाचा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number