मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात विरोधी पक्षनेते राज्य सरकारवर अनेक टीका करत आहे. भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी ट्विट करत मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात राज्यसरकारला प्रश्न विचारला आहे. ‘मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेत सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ राजकीय हेतूने शिवसेनेने मनमानी केल्याने मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळतील का? असा सवाल भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.
तसेच ‘एवढंच नाही तर पुराच्या प्रलयातून मुंबईकरांची सुटका होईल का? आणि सलग २५ वर्षे सत्तेत जे केले नाही ते शिवसेना आता तरी करेल का?’ असे प्रश्न विचारत भालचंद्र शिरसाट यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत. तर अनेक मुंबईकरांनी जीवही गमावला आहे. त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त करण्याची मागणी जोर धरत असून राज्य सरकार रस्त्यांवरील खड्ड्यांकेड दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांकडून मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज्यसरकारवर टीका होत आहे.