राज्यात हिंसाचाराच्या घटना का वाढल्या?

राज्यात हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. काल अमरावतीच्या दोन गावात हिंसाचार झाला आहे. तर मुंबईतील आरे वसाहतीच्या कळस यात्रेतही हाणामारी झाली आहे. त्यामुळे राज्यात हिंसाचाराच्या घटना का वाढल्या?, असा सवाल उपस्थित होत आहे. अमरावतीच्या दोन गावात हिंसाचार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री १० वाजेदरम्यान दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याच्या वादावरून दोन समुदायात तणाव निर्माण […]

राज्यात हिंसाचाराच्या घटना का वाढल्या?

राज्यात हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. काल अमरावतीच्या दोन गावात हिंसाचार झाला आहे. तर मुंबईतील आरे वसाहतीच्या कळस यात्रेतही हाणामारी झाली आहे. त्यामुळे राज्यात हिंसाचाराच्या घटना का वाढल्या?, असा सवाल उपस्थित होत आहे.

अमरावतीच्या दोन गावात हिंसाचार

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री १० वाजेदरम्यान दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याच्या वादावरून दोन समुदायात तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमधील अचलपूर, परतवाडा शहरात कलम १४४ लागू करण्यात आला असून पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. अमरावतीलील दोन्ही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे. सध्या दोन्ही शरहात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल आहे. दरम्यान, दोन्ही शहरात परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या घटनेनंतर येथे पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून पोलिसांची अतिरिक्त तुकडीसुद्धा बोलवण्यात आली आहे.

मुंबईतल्या आरे वसाहतीतल्या कळस यात्रेत हाणामारी

मुंबईच्या गोरेगाव इथे आरे कॉलनीमध्ये गौतम नगर परिसरात रविवारी कळस यात्रा काढण्यात आली होती, मात्र कळस यात्रेमध्ये रात्री आठच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत आठ ते दहा लोक जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. आरे कॉलनीतील घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली, या घटनेमध्ये २५ जणांवर आरे पोलिसांनी गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर, गौतम नगर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number