मोदींच्या फोटोला काळे फासणारे तांबे हवेत कशाला?

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्या २०१८ सालच्या कारनाम्यावर वक्तव्य केले आहे. सत्यजित तांबे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडाला काळं फासत आहेत असा फोटो समाजमाध्यमांवर वायरल झाला आहे. या फोटोवर बावनकुळे यांनी ‘मोदींच्या फोटोला काळे फासणारे तांबे हवेत कशाला?’, या प्रकारचे वक्तव्य केले आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी […]

मोदींच्या फोटोला काळे फासणारे तांबे हवेत कशाला?

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्या २०१८ सालच्या कारनाम्यावर वक्तव्य केले आहे.

सत्यजित तांबे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडाला काळं फासत आहेत असा फोटो समाजमाध्यमांवर वायरल झाला आहे. या फोटोवर बावनकुळे यांनी ‘मोदींच्या फोटोला काळे फासणारे तांबे हवेत कशाला?’, या प्रकारचे वक्तव्य केले आहे.

नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांची उमेदवारी पक्की झालेली असताना, ऐनवेळी गुरुवारी, सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना ‘अपक्ष उमेदवारी असल्यामुळे राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटून, सर्व राजकीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन ते करणार आहेत, असे सत्यजित तांबे म्हटले.
अशा वातावरणात समाजमाध्यमांवर सत्यजित तांबे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तोंडाला काळं फासतानाचा फोटो वायरल झाल्यामुळे,’कोणीही भाजपकडून पाठिंबा मागितलेला नाही आणि भाजपनेही कोणाला पाठिंबा दिलेला नाही आणि जर कोणी पाठिंबा मागितला तर राज्य पार्लमेंटरी बोर्डात जावं लागेल’, असे बावनकुळेंनी वक्तव्य केले आहे.

सत्यजित तांबेंचा हा जुना कारनामा आता चर्चेत आल्यामुळे नाशिक विधान परिषद मतदार निवडणुकीसाठी त्यांच्या अपक्ष उमेदवारीला बाकीच्या पक्षांकडून समर्थन मिळणार की तांबे अपक्ष म्हणूनच मैदानात लढणार ?, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

 

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number