भूषण देसाई का शिंदेंसोबत?

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुषाभ देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाईंनी पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी, बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत, असे भूषण देसाई म्हणाले. ‘राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. […]

भूषण देसाई का शिंदेंसोबत?

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुषाभ देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाईंनी पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे.

यावेळी, बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत, असे भूषण देसाई म्हणाले. ‘राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. मी मुख्यमंत्री शिंदेंचे काम पाहिले आहे. तसेच त्यांच्या कामाची पद्धतही माहित आहे. त्यामुळे त्यांच्यासबोत काम करण्याचा निर्णय घेतला असून शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे भूषण देसाई म्हणाले.’

भूषण देसाई म्हणाले, ‘माझे वडील आणि उद्धव गटाचे नेते सुभाष देसाई यांना माझ्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाबाबत कल्पना दिली होती. माझ्या वडिलांची राजकीय भूमिका वेगळी आहे. तसेच माझी स्वत:ची राजकीय भूमिका वेगळी असू शकते असेही भूषण देसाई म्हणाले.’

भूषणच्या शिंदेंसोबत शिवसेना पक्षप्रवेशावर काय म्हणाले सुभाष देसाई?

माझा मुलगा भूषण देसाई याने सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. भूषणचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीसोबत मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढे सुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाई यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमची भूमिका आणि सरकारचे काम पाहून अनेक बडे नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याप्रमाणेच भूषण देसाई यांनीही पक्षप्रवेश केला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

भूषणचे आर्थिक व्यवहार चर्चेत

भूषण देसाई यांच्यावर आर्थिक व्यवहारप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी भूषण देसाई यांच्यावर वसुली केली असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number