WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचं भन्नाट अपडेट! नवीन मेंबरला आता एका क्लिकमध्ये मिळणार जुनी चॅट हिस्ट्री

व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुपमध्ये नव्याने सामील होणाऱ्यांसाठी ‘ग्रुप मेसेज हिस्ट्री’ फीचर आणले आहे.

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचं भन्नाट अपडेट! नवीन मेंबरला आता एका क्लिकमध्ये मिळणार जुनी चॅट हिस्ट्री

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आपल्या ग्रुप चॅट अनुभवात मोठा बदल घडवणारे नवे फीचर सादर करत आहे. ‘ग्रुप मेसेज हिस्ट्री’ या नावाने येणाऱ्या या सुविधेमुळे ग्रुपमध्ये नव्याने सामील होणाऱ्या सदस्यांना मागील चर्चेचा संदर्भ सहज मिळू शकणार आहे. ग्रुप चॅटमध्ये अनेकदा असे घडते की, एखादा सदस्य उशिरा जोडला गेला की त्याला आधी काय चर्चा झाली याची कल्पना नसते. मग इतर सदस्यांना पुन्हा सर्व माहिती सांगावी लागते किंवा जुने मेसेज शोधून पाठवावे लागतात. या सगळ्या गोंधळावर उपाय म्हणून हे नवे फीचर उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेमुळे ग्रुप अ‍ॅडमिन किंवा इतर सदस्य नव्या व्यक्तीला अलीकडील ठरावीक मेसेजेस निवडून पाठवू शकतात. हे मेसेज थेट त्याच्यापर्यंत स्वतंत्र स्वरूपात पोहोचतात. त्यामुळे नवीन सदस्याला सुरुवातीपासूनच चर्चेचा धागा पकडता येतो आणि “नेमकं काय सुरू आहे?” असा प्रश्न विचारण्याची गरज राहत नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे पर्यायी आहे. कोणत्याही ग्रुपमध्ये हे फीचर आपोआप कार्यरत होणार नाही. अ‍ॅडमिनला ते वापरायचे की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार असेल. गरज वाटल्यास ग्रुपसाठी ही सुविधा बंद ठेवता येईल.गोपनीयतेबाबतही कंपनीने स्पष्ट भूमिका घेतली आहे. शेअर केलेले सर्व मेसेजेस एंड-टू-एंड एन्क्रिप्शनखाली सुरक्षित राहतील. केवळ नव्या सदस्यालाच ते दिसतील; बाहेरील कोणालाही त्यात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे वापरकर्त्यांच्या खाजगी माहितीची सुरक्षा अबाधित राहणार आहे. कुटुंबीयांचे ग्रुप, कार्यालयीन टीम्स, इव्हेंट प्लॅनिंग किंवा विविध समुदायांचे समन्वय यासाठी ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरू शकते. चर्चेची सलगता टिकवून ठेवण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी हे अपडेट फायदेशीर मानले जात आहे. सध्या हे फीचर टप्प्याटप्प्याने वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number