WhatsApp Cloud Storage: व्हॉट्सॲप आणतंय स्वतःचं क्लाऊड स्टोरेज; 1 डॉलरमध्ये 50 GB, चॅट बॅकअपसाठी पैसे मोजावे लागणार?

आजकाल सगळंच डिजिटल झालं आहे. असंख्य चॅट्स, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्ससोबतच ऑफिसच्या कामाचे ग्रुप्स, त्यावरील मीडिया फाईल्स आणि फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप्समुळे व्हॉट्सॲपचा बॅकअप वारंवार घ्यावा लागतो.पण

WhatsApp Cloud Storage: व्हॉट्सॲप आणतंय स्वतःचं क्लाऊड स्टोरेज; 1 डॉलरमध्ये 50 GB, चॅट बॅकअपसाठी पैसे मोजावे लागणार?

आजकाल सगळंच डिजिटल झालं आहे. असंख्य चॅट्स, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्ससोबतच ऑफिसच्या कामाचे ग्रुप्स, त्यावरील मीडिया फाईल्स आणि फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप्समुळे व्हॉट्सॲपचा बॅकअप वारंवार घ्यावा लागतो.पण स्मार्टफोनमधील सध्याची क्लाऊड स्टोरेज सिस्टिम अपुरी पडते, कारण त्यात व्हॉट्सॲपसह इतर सर्व ॲप्सचा डेटाही सामावलेला असतो. त्यामुळे क्लाऊड स्टोरेज लवकरच फुल होते.हीच अडचण लक्षात घेऊन व्हॉट्सॲप आता स्वतःची स्वतंत्र क्लाऊड स्टोरेज सिस्टिम सुरू करत असल्याची माहिती समोर येत आहे.

व्हॉट्सॲपवर चॅट बॅकअप ठेवण्यासाठी आता पैशांचे नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे. कंपनीच्या नवीन धोरणानुसार, व्हॉट्सॲप स्वतःची क्लाउड स्टोअरेज सिस्टीम आणत आहे. या नवीन सुविधेमुळे युजर्सचा डेटा गुगल किंवा ॲपलवर सेव्ह न होता व्हॉट्सॲपच्या स्वतःच्या सर्व्हरवर सुरक्षित ठेवता येईल, ज्यासाठी नवीन नियम लागू केले जातील. एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, व्हॉट्सॲपचे हे क्लाऊड स्टोरेज अँड्रॉइड तसेच आयफोन युजर्स वापरू शकतील.

हेही वाचा – Gemini Security Breach: गुगलच्या 'जेमिनी' AI ने केली हॅकिंग; 3 कंपन्यांच्या सुरक्षित यंत्रणा भेदून मिळवले पासवर्ड्स

व्हॉट्सॲप युजर्सना नेमका काय फायदा होणार?
हे समजण्यासाठी आयफोनचे उदाहरण घेऊ. आयफोन युजर्सना Apple कडून फक्त 5GB फ्री iCloud स्टोरेज मिळते. यातच फोटो, डॉक्युमेंट्स, ॲप डेटा आणि संपूर्ण फोनचा बॅकअप सामावलेला असतो. त्यातच जर व्हॉट्सॲपचा GB मध्ये असलेला चॅट बॅकअप जोडला, तर ही 5GB जागा अपुरी पडते. स्टोरेज फुल झाल्यावर एकतर तुम्हाला जुन्या फाइल्स डिलीट कराव्या लागतात किंवा अधिक स्टोरेजसाठी Apple ला पैसे द्यावे लागतात. Apple च्या सगळ्यात स्वस्त प्लॅनमध्ये 50GB साठी दरमहा सुमारे 100 रुपये मोजावे लागतात. व्हॉट्सॲपचे स्वतःचे क्लाऊड आल्याने युजर्सची या त्रासातून सुटका होणार आहे. व्हॉट्सॲप बॅकअपसाठी वेगळी जागा मिळाल्याने तुमचे iCloud / Google Drive स्टोरेज रिकामे राहील. 

2 GB स्टोरेज फ्री मिळणार?
व्हॉट्सॲपच्या नवीन क्लाऊड प्लॅनमध्ये सुरुवातीला 2 GB पर्यंत स्टोरेज मोफत दिले जाणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या चॅटचा बॅकअप सहज स्टोअर करू शकता. जर तुम्हाला यापेक्षा जास्त जागा हवी असेल, तर मग तुम्हाला पेड प्लॅन घ्यावा लागेल.

व्हॉट्सॲप लवकरच युजर्ससाठी स्वतःची क्लाऊड स्टोरेज सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी दरमहा 1 डॉलर (सुमारे 95 रुपये) मध्ये 50 GB स्टोरेज ऑफर करेल. ज्यांना यापेक्षा जास्त स्टोरेज हवे असेल, त्यांच्यासाठी 1TB पर्यंतचे प्लॅन्स उपलब्ध असतील, ज्यासाठी जास्त शुल्क आकारले जाईल. 

बॅकअप असणार 100% सुरक्षित-
व्हॉट्सॲपच्या या क्लाऊडवर स्टोअर होणारा तुमचा सर्व चॅट बॅकअप पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. म्हणजेच तुमच्या बॅकअपमध्ये थर्ड पार्टी कोणत्याही प्रकारे प्रवेश करू शकणार नाही. Apple चा iCloud जरी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देत असला, तरी ते युजर्सना स्वतःहून Enable करावे लागते. मात्र, व्हॉट्सॲपच्या क्लाऊडमध्ये हा त्रास नसेल. इथे एन्क्रिप्शन डीफॉल्टनुसार चालू (On) असेल आणि ते बंद करण्याचा पर्यायच नसेल. हा बॅकअप पासकी, पासवर्ड आणि एन्क्रिप्शन की ने अधिक सुरक्षित करता येणार आहे.व्हॉट्सॲप क्लाऊड कधी लाँच होणार?सध्या कंपनी या फीचरवर काम करत असून, त्याची सार्वजनिक चाचणी (Public Beta) देखील सुरू झालेली नाही. त्यामुळे हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट होण्यासाठी आणखी काही आठवडे लागू शकतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number