मोदींचे जॅकेट नक्की कशाचे ?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या पोशाखातून ते नेहमी काहीतरी संदेश देत असतात. सध्या पंतप्रधानांनी संसदीय अधिवेशनात घातलेले जॅकेट चर्चेत आले आहे. देश तसा वेश करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासियत आहे. पण, सध्या पंतप्रधानांनी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान संसंदेत जे जॅकेट घातले होते ते चर्चेत आले आहे. […]

मोदींचे जॅकेट नक्की कशाचे ?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या पोशाखातून ते नेहमी काहीतरी संदेश देत असतात. सध्या पंतप्रधानांनी संसदीय अधिवेशनात घातलेले जॅकेट चर्चेत आले आहे.
देश तसा वेश करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासियत आहे. पण, सध्या पंतप्रधानांनी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान संसंदेत जे जॅकेट घातले होते ते चर्चेत आले आहे. पंतप्रधानांनी घातलेले जॅकेट कोणत्याही कापडापासून न बनवता प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन बनवले आहे. हे जॅकेट बनविण्याकरिता २८ प्लास्टिकच्या बाटल्या वापरण्यात आल्या आहेत. हे जॅकेट परिधान करून पंतप्रधानांनी प्लास्टिकच्या पुनर्वापराचा संदेश दिला आहे.
पंतप्रधानांनी बंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीकचा शुभारंभ केला. त्यावेळी इंडियन ऑईलकडून हे प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन बनवलेले जॅकेट त्यांना भेट म्हणून दिले होते. या जॅकेटचा कपडा तमिळनाडूतील करूर शहरातील श्रीरंग पॉलिमर्स या कंपनीने बनवला आहे. तसेच, पंतप्रधानांच्या गुजरातमधील टेलरकडून हे जॅकेट तयार करून घेतले आहे.

कसे तयार केले प्लास्टिकचे जॅकेट ?

प्लास्टिकचे जॅकेट तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या धुऊन नंतर बारीक कापल्या जातात. यातून मिळालेल्या प्लास्टिक फायबरपासून धागा तयार केला जातो. नंतर हातमाग यंत्राद्वारे याचे धाग्यात रुपांतर केले जाते. विशेष म्हणजे धाग्यांना रंग देताना या प्रक्रियेत पाण्याच्या एकाही थेंबाची गरज लागत नाही. अशा प्रकारे, प्लास्टिकच्या पुनर्वापरापासून जॅकेट तयार करण्यासाठी २ हजार रुपये खर्च येतो.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number