गेटवे ते मांडवा जलवाहतूक २६ मेपासून चार महिने बंद

गेटवे ते मांडवा जलवाहतूक सुखकारक आणि आनंददायी प्रवासासाठी उत्तम असल्याने प्रवाशांची पहिली पसंती आहे; मात्र आता पावसाळ्यात ही सेवा चार महिने बंद राहणार आहे.

गेटवे ते मांडवा जलवाहतूक २६ मेपासून चार महिने बंद

रायगड, १८ मे २०२४, प्रतिनिधी : गेटवे ते मांडवा जलवाहतूक सुखकारक आणि आनंददायी प्रवासासाठी उत्तम असल्याने प्रवाशांची पहिली पसंती आहे; मात्र आता पावसाळ्यात ही सेवा चार महिने बंद राहणार आहे. २६ मेपासून खबरदारी म्हणून सेवा बंद राहणार असल्याचे परिपत्रक मेरीटाइम बोर्डाने जारी केले आहे. परिणामी अलिबागमध्ये येणाऱ्या प्रवाशांना रस्ते मार्गाने चार महिने प्रवास करावा लागणार आहे. मात्र, मांडवा ते भाऊचा धक्का ही रो-रो सेवा मात्र पावसाळ्यात सुरू राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number