राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या विदर्भ दौरा

नागपुरात, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विदर्भ दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं मंगळवारी सायंकाळी ७ वाजता नागपुरात आगमन होणार आहे. बुधवारी सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री […]

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या विदर्भ दौरा

नागपुरात, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विदर्भ दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं मंगळवारी सायंकाळी ७ वाजता नागपुरात आगमन होणार आहे. बुधवारी सकाळी त्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हेही राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दौऱ्यादरम्यानचे कार्यक्रम

  • राष्ट्रपती ५ जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत.
  • या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतणार आहेत. त्याच दिवशी दुपारी कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन आणि आरतीमध्ये त्या सहभागी होतील.
  • त्यानंतर कोराडी मंदिर परिसरातील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number