Asha Bhosle Passed Away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; बावनकुळेंसह शेलार आणि इतर भाजप नेत्यांकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. याचपार्श्वभूमिवर भाजपमधील नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. 

Asha Bhosle Passed Away : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; बावनकुळेंसह शेलार आणि इतर भाजप नेत्यांकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. काल 11 एप्रिल रोजी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज त्यांचे दु:खद निधन झाले त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी ही दुर्दैवी बातमी दिली. दरम्यान उद्या सकाळी 11.00 ते 3.00 दरम्यान अंतिम दर्शनासाठी लोअर परळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवलं जाईल. तर उद्या सायंकाळी 4.00 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. दादर शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. आशा भोसले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. याचपार्श्वभूमिवर भाजपमधील नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. 
 

आशिष शेलार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, 

जगण्यातील श्रीमंती गमावली !
भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या… जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या… कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या… भाषेची बंधने तोडून २० पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या… स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या… आणि भाऊबीजेला “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती…” अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या. 
माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली… साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही…माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली…
त्यांच्या असंख्य भेटी माझ्या हृदयात साठवलेल्या आहेत… काही दिवसांपूर्वीची ही एक संस्मरणीय भेट

 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 
आशाताई,
काय लिहू? सारेच निशब्द आहे !!
निव्वळ चैतन्य लिहू की दैवी सूर लिहू?
वयाला व आवाजाला मिळालेले ययातीचे तारुण्य लिहू?
तुम्ही अद्भुत ! 
जगण्यातला उत्साह आणि उत्साहाने जगणं क्षणभरात निमालं ! संपलं. आम्ही अपूर्ण झालो! 
सुरांच्या वैविध्यावरील तुमचे भाष्य म्हणजे, तुम्ही संगीतातील विद्यापीठ. एक युग संपले !
आशाताई, तुमच्या जाण्याने गाण्याचं, चैतन्याचं, शैलीदार माणुसकीचं, चविष्ट पाककेलेचं अभूतपूर्व साम्राज्य लोप पावलं.
मना, तुझे मनोगत मला कधी कळेल का?
तुझ्यापरी गूढ.. सोपे होणे मला जुळेल का?
असा प्रश्न विचारणाऱ्या तुम्ही उत्तर देऊन निघून गेल्या.
कायम प्रसन्न आशादायी आशा, आज निराशा करून पुढच्या प्रवासाला कायमची निघून गेली.
आशाताई, तुम्ही गायलेली कितीतरी गाणी मनात आहेत. डोक्यात आहे. हृदयात आहेत. 
काय लिहू आशाताई?
तुमच्या जाण्याने दैवी सुरांची आशा संपली.
आशाताई नावाचे आनंदाचे गाव.. राम राम करून दूर निघून गेले.
ताई, तुम्ही अजरामर आहात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number