Deool Band 2 Box Office: ‘वेड’चा रेकॉर्ड मोडीत! बॉक्स ऑफिसवर ‘देऊळ बंद 2’ चा धमाका; सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-4 चित्रपटांत स्थान

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचे अनेक जुने विक्रम मोडीत काढले आहेत. अवघ्या 10 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात मोठे यश मिळवले.

Deool Band 2 Box Office: ‘वेड’चा रेकॉर्ड मोडीत! बॉक्स ऑफिसवर ‘देऊळ बंद 2’ चा धमाका; सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-4 चित्रपटांत स्थान

Deool Band 2 Box Office: प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचे अनेक जुने विक्रम मोडीत काढले आहेत. अवघ्या 10 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात मोठे यश मिळवले असून, त्याची घोडदौड अजूनही सुरूच आहे.

20 व्या दिवशीही दमदार कमाई; 75 कोटींच्या टप्प्याकडे वाटचाल
प्रदर्शनच्या 20 व्या दिवशी या चित्रपटाने 1.1 कोटींचा गल्ला जमवला. आदल्या दिवसाच्या तुलनेत (19 व्या दिवशी) कमाईत 4.34 टक्क्यांची किंचित घट झाली असली, तरी चित्रपटाचा एकूण आलेख थक्क करणारा आहे. 'देऊळ बंद 2' ने आतापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर 62 कोटींची निव्वळ (Net) आणि 73.16 कोटींची एकूण (Gross) कमाई केली आहे. हा चित्रपट आता लवकरच 75 कोटींचा टप्पा पार करण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 30.2 कोटी आणि दुसऱ्या आठवड्यात 22.4 कोटींचा शानदार व्यवसाय केला होता. तिसऱ्या आठवड्यातील दैनंदिन कमाई पाहता, 16 व्या दिवशी 1.4 कोटी, 17 व्या दिवशी 2.6 कोटी, 18 व्या दिवशी 3.15 कोटी आणि 19 व्या दिवशी 1.15 कोटींचे संकलन झाले होते.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये 'देऊळ बंद 2' टॉप-4 मध्ये सामील
या वादळी कामगिरीसह 'देऊळ बंद 2' ने रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटाला (61.2 कोटी) मागे टाकत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad: 'मराठी चित्रपटसृष्टी एवढी लाचार कधीच नव्हती…'; 'सावित्रीबाई फुले' मालिका बंद पडण्यावरून जितेंद्र आव्हाडांचा नाना पाटेकर, प्राजक्ता माळींवर निशाणा

मराठी चित्रपटसृष्टीतील ऑल टाईम टॉप-10 चित्रपटांची यादी

1. राजा शिवाजी: 105.64 कोटी
2. सैराट: 90 कोटी
3. बाईपण भारी देवा: 76.28 कोटी
4. देऊळ बंद 2: 62 कोटी
5. वेड: 61.2 कोटी
6. नटसम्राट: 42 कोटी
7. पावनखिंड: 37.72 कोटी
8. लय भारी: 37 कोटी
9. कट्यार काळजात घुसली: 35 कोटी
10. ठाकरे: 31.6 कोटी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number