Vande Bharat Sleeper Train: प्रवाशांना नवीन वर्षाची ‘ग्रँड’ भेट; देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ‘या’ मार्गावर धावणार

180 किमी वेग क्षमता, आधुनिक सुरक्षा प्रणाली आणि आरामदायक स्लीपर सुविधा असलेली ही ट्रेन ईशान्य व पूर्व भारतासाठी वेगवान आणि आधुनिक प्रवासाचा नवा पर्याय ठरणार आहे.

Vande Bharat Sleeper Train: प्रवाशांना नवीन वर्षाची ‘ग्रँड’ भेट; देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ‘या’ मार्गावर धावणार

नवी दिल्ली: नव्या वर्षाच्या निमित्ताने मोदी सरकारने देशवासियांना मोठी भेट दिली असून, भारतीय रेल्वेची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Sleeper Train) कोणत्या मार्गावर धावणार, याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी ते कोलकाता या मार्गावर धावणार असून, लवकरच तिचे उद्घाटन होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्वतः या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे.

अलीकडेच स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची अंतिम हाय-स्पीड चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. ही चाचणी कोटा–नागदा सेक्शनवर पार पडली असून, या दरम्यान ट्रेनने तब्बल 180 किमी प्रतितास वेग गाठला. ही चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली घेण्यात आली होती, ज्यामुळे ट्रेनच्या सुरक्षिततेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सहा महिन्यांत आठ वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत दाखल होतील, तर 2026 अखेरपर्यंत 12 ट्रेन धावू लागतील. विशेष म्हणजे, गुवाहाटीहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांना अस्सामी जेवण, तर कोलकाताहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये बंगाली जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हेही वाचा: Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिका निवडणूक; शिंदेसेनेला मोठा धक्का! 5 उमेदवारांचे अर्ज बाद, 'एबी' फॉर्ममधील चुका नडल्या

वंदे भारत स्लीपर ट्रेनचा रूट आणि रचना

ही ट्रेन कोलकाता-गुवाहाटी मार्गावर धावणार असून, पश्चिम बंगाल आणि आसाममधील महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असतील. त्यामध्ये 11 थर्ड एसी, चार सेकंड एसी आणि एक फर्स्ट एसी डबा असेल. या ट्रेनमधून एकावेळी सुमारे 823 प्रवासी प्रवास करू शकतील.

वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्ये

ही एक सेमी हाय-स्पीड ट्रेन असून तिचे डिझाइन स्पीड 180 किमी प्रतितास आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सॉफ्ट आणि आरामदायक बर्थ देण्यात आले आहेत. कोचदरम्यान ये-जा करण्यासाठी ऑटोमॅटिक दरवाजांची सुविधा आहे. सुधारित सस्पेंशन प्रणालीमुळे कमी आवाजात आणि अधिक शांत प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. सुरक्षिततेसाठी कवच सुरक्षा प्रणाली (Kavach Safety System), इमर्जन्सी टॉक-बॅक सिस्टम, तसेच अत्याधुनिक ड्रायव्हर केबिन देण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी विशेष डिसइन्फेक्टंट टेक्नॉलॉजी वापरण्यात आली असून, ट्रेनचा बाह्य डिझाइन एरोडायनामिक आणि आकर्षक आहे.

जानेवारीतच उद्घाटन

रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन 15 ते 20 दिवसांत होण्याची शक्यता आहे. 17 किंवा 18 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचे उद्घाटन होऊ शकते.

एकूणच, वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे ईशान्य भारत आणि पूर्व भारताला वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक रेल्वे सेवेचा नवा पर्याय मिळणार असून, भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

हेही वाचा: BMC Election 2026 : मुंबईचा महापौर उत्तर भारतीय की मराठी? नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number