आजपासून लसीच्या बूस्टर डोसला सुरूवात

देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडा अधिक आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध घालण्यात आले असून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच आता कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आजपासून लसीच्या बुस्टर डोसला सुरूवात झाली आहे. राज्यात आरोग्य कर्मचारी आणि […]

आजपासून लसीच्या बूस्टर डोसला सुरूवात

देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडा अधिक आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध घालण्यात आले असून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच आता कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आजपासून लसीच्या बुस्टर डोसला सुरूवात झाली आहे.

राज्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला आजपासून बुस्टर लस देण्यात येणार आहे. तसेच ६० वर्षावरच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांनाही बुस्टर डोस देण्यात येणार आहे. मुंबईत ३०२ सरकारी, १४९ खासगी आणि ४५१ लसीकरण केंद्रांवर नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरणाला वेग आला आहे. सर्व नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आजपासून बूस्टर डोस देण्यास सुरूवात झाली आहे. यानुसार मुंबई महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

असे आहेत नियम?

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यात येईल.

कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिने पूर्ण असणे आवश्यक.

बूस्टर डोस घेण्यासाठी ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीने सुविधा उपलब्ध.

शासकीय केंद्रावर विनामूल्य लसीकरण.

तसेच खासगी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी केंद्राने घोषित केलेल्या किंमतीत लसीकरण.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number