रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस आहे. तर दिवसेंदवस रशियाचे युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र होत चालले आहेत. अशातच, युक्रेनही माघार घेण्यास तयार नसून जशास तसे उत्तर देत आहे. युक्रेनमध्ये क्षेपणास्त्र हल्ले सुरू असल्यामुळे तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिका युक्रेनला १ अब्ज डॉलरची मदत करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. तसेच रशियाला युक्रेनवरील हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही बायडेन यांनी रशियाला दिला आहे.
अमेरिकेच्या ‘स्टेट ऑफ द युनियन’ला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांनी रशियावर टीका केली आहे. रशियाची आर्थिक कोंडी करणार असून अमेरिकेची हवाई हद्द रशियासाठी बंद करण्यात आल्याची घोषणा बायडेन यांनी केली आहे. तसेच युक्रेनला १ अब्ज डॉलरची मदत देणार असून रशियाला युक्रेनेवरील हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा बायडेन यांनी रशियाला दिला आहे.
रशियासाठी अमेरिकेची हवाई हद्द बंद.
युक्रेनला एक अब्ज डॉलरची मदत.
युरोपियन युनियनचे सुमारे २७ देश सध्या युक्रेनसोबत.
हुकूमशाहांना धडा शिकवणे गरजेचे आहे.
आर्थिक निर्बंधांमुळे रशिया आणखी कमकुवत होणार.
युक्रेनियन धैर्याने लढत आहेत.
अमेरिका युद्धात सहभागी होणार नाही.
पुतीन कधीच युक्रेनियन नागरिकांचे मने जिंकू शकत नाहीत.