US – Iran War Update : LPG नंतर आता भारतावर डाटा संकट? होर्मुझ तणाव वाढल्यास इंटरनेटवर परिणामाची शक्यता

भारतीय व्यावसायिक टँकरला होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग देण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली असून यामुळे आंतरराष्ट्रीय इंटरनेट डेटा आणि फोनमधील कॉलिंग सेवा बंद होण्याची शक्यता आहे. 

US – Iran War Update : LPG नंतर आता भारतावर डाटा संकट? होर्मुझ तणाव वाढल्यास इंटरनेटवर परिणामाची शक्यता

गेल्या चार ते पाच दिवसांपासून इराणकडून कोणत्याही भारतीय व्यावसायिक टँकरला होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग देण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारताने इराणशी संपर्क साधून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. ऊर्जा पुरवठा सुरळीत राहणे आणि व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवणे हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातून भारताच्या आंतरराष्ट्रीय इंटरनेट ट्रॅफिकचा मोठा भाग जातो. त्या भागातील युद्ध किंवा लष्करी हालचालींमुळे समुद्राखालील फायबर केबल्सना धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय इंटरनेट डेटा आणि फोनमधील कॉलिंग सेवा बंद होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा- PM Narendra Modi: होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजे अडकली? इराणच्या राष्ट्रपतींशी पंतप्रधान मोदींची थेट चर्चा, काय घडलं?

मोबाईल टॉवर तयार करणाऱ्या गॅल्वेनायजेशन कंपनीला प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात LPG वा LNG चा वापर करावा लागतो. दरम्यान आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका गॅस पुरवठ्यावर झाला असून गॅस पुरवठा बंद झाला आहे. मात्र LPG वा LNG च्या पुरवठ्याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने आदेश दिले की, सरकारी कंपन्या केवळ घरगुती ग्राहकांना एलपीजी पुरवतील. ज्यामुळे गॅस न मिळाल्यास टॉवर तयार करण्याचे प्रकल्प बंद करावे लागू शकते. हे प्रकल्प बंद झाले तर कॉल ड्रॉप होतील आणि इंटरनेटचा वेग कमी होईल. आता टॉवरचे उत्पादन आणि मेन्टनन्ससाठी सुद्धा गॅस मिळत नसल्याने कंपन्यांपुढे मोठे संकट उभे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number