कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला भारतात आणलं आहे. रवी पुजारीला तब्बल १५ वर्षांनंतर भारतात आणण्यात यश आलं आहे.
पुजारीला सेनेगल येथून सकाळी नवी दिल्लीत आणण्यात आलं. तिथून बंगळुरुला नेण्यात आलं. पुजारीला सकाळी 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी रवी पुजारी याला दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल येथून अटक करण्यात आली होती. भारतीय पोलिसांनी ही अटक केली होती.
रवी पुजारी याच्यावर खंडणी, धमकी, वसुली यासारखे अनेक गंभीर गुन्ह्याचीं त्याच्यावर नोंद होती. रवी पुजारी याच्यावर २०० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
रवी पुजारी याच्यावर खंडणीच्या अनेक गुन्ह्यांमुळे तपास यंत्रणांचा त्याच्यावर लक्ष होतं.