रशिया-युक्रेनमध्ये गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून तणाग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. अशातच, ‘रशियाचे लष्करी सैन्य युक्रेन राजधानी कीवमध्ये घुसल्याने कीव रिकामी करा’, अशी विनंती अमेरिकेकडून युक्रेन राष्ट्राध्यक्षांना करण्यात आली आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेची मागणी फेटाळली आहे.
रशियाचे सैन्य कीवमध्ये घुसल्यामळे कीव शहर रिकामी करण्याची मगाणी अमेरिकेकडून युक्रेनला करण्यात आली. मात्र, युक्रेन राष्ट्राध्य झेलेन्स्की यांनी अमेरिकेची विनंती फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, कीवमध्ये रशिया लष्करी सैन्याविरुद्ध लढाई सुरू आहे. अशावेळी देशाला सोडून मी कुठेही जाणार नाही. तर यावेळी दारुगोळा पाठवण्याची विनंती झेलेन्स्की यांनी अमेरिकेला केल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी युद्धातील युक्रेनची भूमिका मांडण्यासाठी स्वत:ची चित्रफीत बनवली आहे. झेलेन्स्की म्हणाले, ‘आम्ही शरण येऊ अशी अफवा पसरवण्यात येत आहे. मात्र आम्ही शस्त्र टाकणार नाहीत. आमच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू.’