Uddhav Thackeray Met Abhijeet Dipke : ‘ही चिंगारी आता विझू देऊ नका, तुम्ही फक्त युवा नाही तर देशाचं भविष्य आहात’; उद्धव ठाकरेंनी वाढवलं आंदोलनकर्त्यांचं मनोबल

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे काल, मंगळवारी दिल्लीला पोहोचले. त्यांनी आंदोलनकर्ते आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. दीपके यांनी सोनम वांगचूक यांच्या उपोषणापासून सातत्यानं साथ दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंचे […]

Uddhav Thackeray Met Abhijeet Dipke : ‘ही चिंगारी आता विझू देऊ नका, तुम्ही फक्त युवा नाही तर देशाचं भविष्य आहात’; उद्धव ठाकरेंनी वाढवलं आंदोलनकर्त्यांचं मनोबल

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे काल, मंगळवारी दिल्लीला पोहोचले. त्यांनी आंदोलनकर्ते आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. दीपके यांनी सोनम वांगचूक यांच्या उपोषणापासून सातत्यानं साथ दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंचे आभार मानले. तर आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी, अभिजीतने पेटवलेली ही चिंगारी आता विझू देऊ नका. तुम्ही फक्त युवा नाही, तर देशाचं भविष्य आहात. मी तुम्हाला हिम्मत देण्यासाठी आणि तुमच्याकडून हिम्मत घेण्यासाठी आलो असल्याचं सांगत आंदोलन अधिक व्यापक करण्याचं आवाहन केलं. 

हेही वाचा : Dharmendra Pradhan: “संघर्ष निर्माण करण्याचा हा प्रकार” नीट पेपरफुटी आंदोलनावर धर्मेंद्र प्रधान थेट म्हणाले, काँग्रेसवर सडकून टीका

यावेळी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हेदेखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांची भेट घेत त्यांना आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, असा वडीलकीचा सल्ला दिला. उद्धव ठाकरे येताच दीपके यांनी उद्धव ठाकरे यांचा हात धरुन त्यांना स्टेजवर नेले. उद्धव ठाकरे आणि अभिजीत दीपके यांनी मंचावरुन हात उंचावत जंतरमंतरवरील तरुणांना अभिवादन केले.

यावेळी उद्धव ठाकरे संबोधित करताना म्हणाले की, फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, तर व्यवस्था बदलली पाहिजे. सत्ताबदल केल्याशिवाय तुमच्या जीवनात बदल होणार नाही. तुम्ही बिनधास्त आंदोलन करा आम्ही तुमच्या सोबत आहोत. महाराष्ट्राचा एक युवक तुमचे नेतृत्व करत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही घाबरु नका, काल तुम्ही जी हिंमत दाखवली त्याला मी नमन करतो. आज सारी दिवारे तुट चुकी आहे. तुमच्या आमच्यातील जातीधर्माच्या सर्व भिंती उभ्या केल्या होत्या त्या आता तुटल्या आहे. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. नेशन, वन इमोशन झाले आहे. आम्ही तुमच्यासोबत होतो, आहोत आणि शेवटपर्यंत लढू, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number