ठाण्यात येऊनही उद्धव ठाकरे आनंद आश्रमात गेलेच नाहीत. शुक्रवारी आनंद दिघे जयंती निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांच्या स्मृतींसमोर नतमस्तक झाले.
गुरुवारी उद्धव ठाकरे ठाण्यात वैद्यकीय शिबिराचे उदघाटन करायला गेले होते. यानंतर, ते जैन मंदिरातही गेले मात्र ठाण्यात असूनसुद्धा त्यांनी आनंद आश्रमात जाणे टाळले. ठाण्यात असताना उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केले मात्र ते आनंद आश्रमात गेलेच नाहीत.
आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रम आणि शक्तिस्थळ येथे जाऊन अभिवादन केले.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.