UAE Drone Attack: UAE मध्ये ड्रोन हल्ल्याने खळबळ! तीन भारतीय जखमी; पंतप्रधान मोदींचा कडक इशारा,’पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे…’

यूएईतील फुजैराहमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले. पंतप्रधान मोदींनी या घटनेचा निषेध करत शांततेसाठी संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

UAE Drone Attack: UAE मध्ये ड्रोन हल्ल्याने खळबळ! तीन भारतीय जखमी; पंतप्रधान मोदींचा कडक इशारा,’पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे…’

UAE Drone Attack: संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह ऑइल इंडस्ट्री झोनमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत नागरिक आणि पायाभूत सुविधांवर हल्ला करणे ‘अस्वीकार्य’ असल्याचे स्पष्ट केले आहे.

पंतप्रधानांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यात म्हटले की, अशा प्रकारचे हल्ले शांततेसाठी गंभीर धोका निर्माण करतात. भारत यूएईसोबत ठामपणे उभा आहे आणि सर्व प्रश्न संवाद आणि राजनैतिक मार्गाने सोडवण्याचा आग्रह धरतो. तसेच, होर्मूझ सामुद्रधुनीतून होणारी मुक्त आणि निर्बंधविरहित वाहतूक जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

हेही वाचा: Iran Attack UAE India Reaction: ‘या कारवाया त्वरित थांबवा’; UAE वरील हल्ल्याचा भारताने नोंदवला निषेध, इराणला सुनावले खडे बोल

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या हल्ल्याचा निषेध करत तातडीने संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, निष्पाप नागरिक आणि महत्त्वाच्या सुविधांना लक्ष्य करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. पश्चिम आशियात पुन्हा शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी संवाद हा एकमेव मार्ग असल्याचे भारताने पुन्हा स्पष्ट केले आहे.

फुजैराहमधील भारतीय दूतावासानेही या घटनेची दखल घेत जखमी भारतीयांच्या उपचारासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला असल्याचे सांगितले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत दिली जात आहे.

यूएईच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशाच्या हवाई हद्दीत तीन क्षेपणास्त्रांचा यशस्वीपणे अडथळा करण्यात आला, तर एक क्षेपणास्त्र समुद्रात कोसळले. या हल्ल्यामुळे फुजैराह ऑइल इंडस्ट्री झोनमध्ये मोठी आग लागली होती. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

हेही वाचा: Middle East Tension : इराण-अमेरिका युद्धाला नवे वळण! होर्मुजच्या समुद्रात नौदलाची चकमक; ट्रम्प यांचा नवा ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ सुरू

ही घटना अशा काळात घडली आहे, जेव्हा अमेरिके आणि इराण यांच्यातील तणावामुळे होर्मूझ सामुद्रधुनीतील परिस्थिती आधीच संवेदनशील आहे. जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने या भागाचे महत्त्व लक्षात घेता, अशा प्रकारचे हल्ले संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.

या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाला शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, जखमी भारतीयांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number