ट्विटरची निळी चिमणी उडाली

एलॉन मस्क यांनी ट्विटर हे माध्यम अधिग्रहीत केल्यानंतर ट्विटर अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मागील काही दिवसांमध्ये ट्विटरवर अनेक बदल समोर आले आहेत. अशातच, आता ट्विटरचा लोगो बदलण्यात आला आहे. ट्विटरचा लोगो म्हणून निळा पक्षी काढण्यात आला असून त्याऐवजी कुत्र्याचे लोगो लावण्यात आले आहे. हा कुत्रा क्रिप्टो करन्सी डॉज कॉईनचा लोगो आहे. ट्विटर माध्यम अधिग्रहीत […]

ट्विटरची निळी चिमणी उडाली

एलॉन मस्क यांनी ट्विटर हे माध्यम अधिग्रहीत केल्यानंतर ट्विटर अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मागील काही दिवसांमध्ये ट्विटरवर अनेक बदल समोर आले आहेत. अशातच, आता ट्विटरचा लोगो बदलण्यात आला आहे. ट्विटरचा लोगो म्हणून निळा पक्षी काढण्यात आला असून त्याऐवजी कुत्र्याचे लोगो लावण्यात आले आहे. हा कुत्रा क्रिप्टो करन्सी डॉज कॉईनचा लोगो आहे.

ट्विटर माध्यम अधिग्रहीत केल्यावर एलॉन मस्क चर्चेत आले. त्यानंतर मस्क यांनी ट्विटरबाबत अनेक निर्णय घेतले. दरम्यान, आत मस्क यांनी ट्विटरची ओळख असलेली निळी चिमणी बदलण्याचा म्हणजेच ट्विटरचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतला. निळी चिमणी बदलून मस्क यांनी कुत्र्याचा लोगो वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे मस्क यांनी अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कुत्र्याचा लोगो असलेला फोटोही अपलोड केला आहे. दरम्यान, ट्विटरच्या लोगोमध्ये झालेल्या अचानक बदलामुळे वापरकर्ते हैराण झाले.

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलण्याचा निर्णय घेत एक गमतीशीर ट्वीटही केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी वाहन चालक परवाना तपासणाऱ्या एका ट्रफिक पोलीस अधिकाऱ्याने ट्विटरची निळी चिमणी असलेला आयकार्ड हातात धरलं आहे. त्या गाडीत एक कुत्रा बसला आहे. हा कुत्रा म्हणजे ट्विटरचा नवा लोगो होय. गाडीतला हा कुत्रा ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला सांगतोय की, ‘वाहन चालक परवान्यावर असलेला फोटो हा जुना आहे.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number