स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात. या मालिकेत अलीकडेच लीप दाखवण्यात आला. त्यानंतर काही दिवसांपासून श्वेता आणि कार्तिक दीपाला मुद्दाम त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहेत. पण आता मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे.श्वेता आणि कार्तिकचे पितळ आता सौंदर्याच्या समोर उघडं पडणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेची क्रेझ कायम आहे. सध्या मालिकेच्या कथानकात गुंतागुंत पाहायला मिळत आहे. अशातच कार्तिक आणि श्वेताची चांगली गट्टी जमली असून ते आता दीपाला वेडं ठरवत आहे. दरम्यान मालिकेत आता आयेशाची पुन्हा एन्ट्री झाली आहे. आयेशालादेखील वेड लागल्याचं दिसून येत आहे.
आता मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे. दीपासोबत काहीतरी चुकीचे होत असलयाचे सौंदर्याला आढळणार आहे. आता मालिकेच्या पुढील भागातती या प्रकरणाची चौकशी करताना दिसेल. त्यामुळे कार्तिक आणि श्वेताचे सर्व कारस्थान समोर येणार आहे. यानंतर मालिकेत काय घडणार याकडे मालिकाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.