नागपूरच्या रहाटे कॉलनी परिसरात चालत्या ट्रकच्या कॅबिनला अचानक आग लागली. सुदैवाने प्रसंगावधान राखत ट्रकचा चालक बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. ट्रकदेखील रिकामी असल्याने मालाचे नुकसान झाले नाही. मात्र, ट्रकचे कॅबिन जळून नष्ट झाले. ट्रकच्या इंजिनमधील तांत्रिक बिघडाने शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
तर पालघरमध्ये मनोर मार्गावर धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. गवताच्या गथडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान म्हणून चालकाने ट्रक थेट नदीत उतरवला. चालकाच्या प्रसंगधावनामुळे जीवितहानी टळली. मात्र टेम्पोमधील सर्व गवताचे गथडे जळून खाक झाले.