आदिवासी विकास महामंडळ भरती घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल

राज्याच्या आदिवासी विकास महामंडळ व शबरी महामंडळातील नोकर भरतीत झालेल्या घोटाळा प्रकरणी आदिवासी विभागाच्या २ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनी मालकाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१४ ते २०१६ दरम्यान राज्याच्या आदिवासी विभागातील या दोन महामंडळांमध्ये ५८४ पदांसाठी नोकरभरती झाली. या नोकरभरतीमध्ये जवळपास ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री […]

आदिवासी विकास महामंडळ भरती घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल

राज्याच्या आदिवासी विकास महामंडळ व शबरी महामंडळातील नोकर भरतीत झालेल्या घोटाळा प्रकरणी आदिवासी विभागाच्या २ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनी मालकाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१४ ते २०१६ दरम्यान राज्याच्या आदिवासी विभागातील या दोन महामंडळांमध्ये ५८४ पदांसाठी नोकरभरती झाली. या नोकरभरतीमध्ये जवळपास ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने याप्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि अखेर आज या नोकरभरती घोटाळा प्रकरणी आदिवासी विभागातील तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे, तत्कालीन अप्पर आयुक्त अशोक लोखंडे आणि ज्या संस्थेच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली गेली, त्या कंपनीचे संचालक कुणाल कोल्हे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number