खंडोबा यात्रेतील पेंबर गावची ‘ही’ परंपरा माहीत आहे का?

महाराष्ट्र कर्नाटकमधील बारा बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडच्या पालीच्या खंडोबाची यात्रा म्हणजे खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा यात्रा सुरू होत आहे. या यात्रेत पेंबर गावातून खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी नदीपलीकडे असणाऱ्या पाली गावात हत्तीवरुन मानकऱ्यांच्या सोबत जातो. अशी परंपरा असून तीन वर्षापूर्वी यात्रेत हत्ती बिथरल्याने मिरवणुकीसाठी ट्रॅक्टरला जोडलेला रथ वापरला जात आहे. त्यातून देवाला विवाहस्थळी नेण्यात […]

खंडोबा यात्रेतील पेंबर गावची ‘ही’ परंपरा माहीत आहे का?

महाराष्ट्र कर्नाटकमधील बारा बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडच्या पालीच्या खंडोबाची यात्रा म्हणजे खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा यात्रा सुरू होत आहे. या यात्रेत पेंबर गावातून खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी नदीपलीकडे असणाऱ्या पाली गावात हत्तीवरुन मानकऱ्यांच्या सोबत जातो. अशी परंपरा असून तीन वर्षापूर्वी यात्रेत हत्ती बिथरल्याने मिरवणुकीसाठी ट्रॅक्टरला जोडलेला रथ वापरला जात आहे.

त्यातून देवाला विवाहस्थळी नेण्यात येतं. यावेळी भाविक ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा गजर करत रथावर भंडार खोबरे उधळण करतात.

दुपारी देव मुख्यमंदीरातुन मानकऱ्यांसोबत रथातुन विवाहासाठी बाहेर पडतो.

त्यापूर्वी भाविक नदीपात्रातील वाळवंटात घरातील देवांची जागरण गोंधळ घालुन पूजा करतात, तर काही लोक मुलांच्या वजनाएवढे भंडारा खोबरं उधळण्याचा नवस फेडतात.

त्यासाठी मुलांचं वजन करुन भंडारा विक्रीची दुकानं यात्रेत थाटण्यात आली आहेत.

देवस्थान, प्रशासन पोलिसांकडून लाखोंच्या यात्रेचे योग्य नियोजन केलं असल्यामुळे आणि चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे भाविकांना दर्शन घेणं सुलभ होतं.

मुख्य विवाह सोहळा सांयकाळी उशीर पार पडतो. मात्र देव मानकऱ्या सोबत जात असताना भाविक भंडार खोबरं उधळून दर्शन घेऊन परत फिरतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number