University of Toronto: PhD चे स्वप्न राहिले अर्धवट; टोरांटोमधील गोळीबारात भारतीयाचा मृत्यू

पोलिसांनी या प्रकरणाचा हत्येचा गुन्हा म्हणून तपास सुरू केला असून, भारतीय दूतावासाने शोक व्यक्त केला आहे.

University of Toronto: PhD चे स्वप्न राहिले अर्धवट; टोरांटोमधील गोळीबारात भारतीयाचा मृत्यू

टोरांटो : कॅनडामधील University of Toronto Scarborough (UTSC) परिसराजवळ झालेल्या गोळीबारात 20 वर्षांचा भारतीय पीएचडी (Doctoral) विद्यार्थी शिवांक अवस्थी याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कॅनडियन पोलिसांनी या घटनेची हत्येचा गुन्हा (Homicide) म्हणून चौकशी सुरू केली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ही घटना मंगळवार, 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी घडली. Toronto Police ना दुपारी सुमारे साडे तीन वाजता Highland Creek Trail आणि Old Kingston Road परिसरात जखमी व्यक्ती पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना गोळी लागलेली व्यक्ती आढळून आली आणि त्याला घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती Duty Inspector Jeff Allington यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबारानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे. सध्या कोणत्याही संशयिताचे वर्णन जाहीर करण्यात आलेले नाही. “आमचे प्राथमिक उद्दिष्ट घटनास्थळावरील पुरावे सुरक्षित ठेवणे, नेमके काय घडले ते शोधणे आणि मृताच्या कुटुंबीयांना माहिती देणे हे आहे. त्यामुळे सध्या अधिक तपशील देणे शक्य नाही,” असे Allington यांनी सांगितले.

हेही वाचा: Pune BJP: पुणे भाजपची पहिली यादी तयार! 100 हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब; आज होणार अधिकृत घोषणा

दरम्यान, टोरांटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने (Indian Consulate in Toronto) या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. X वर पोस्ट करत दूतावासाने म्हटले आहे की, “UTSC परिसराजवळ झालेल्या गोळीबारात भारतीय पीएचडी विद्यार्थी शिवांक अवस्थी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आम्हाला अतिशय दुःख झाले आहे. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत सर्व आवश्यक मदत देत आहोत.”

University of Toronto Scarborough प्रशासनानेही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मात्र, त्यांनी मृत व्यक्ती विद्यापीठाचा विद्यार्थी होता की नाही, याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. “आम्ही या दुर्दैवी घटनेमुळे अत्यंत व्यथित आहोत. पोलिस, कॅम्पस सेफ्टी आणि आपत्कालीन सेवांनी तात्काळ कारवाई केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत,” असे विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

सुरक्षेच्या दृष्टीने UTSC कॅम्पसकडून Safety Alert जारी करण्यात आला असून, इमारतीत असलेल्या व्यक्तींनी आतच राहावे आणि बाहेर असलेल्यांनी परिसर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Highland Creek Valley परिसरातील सर्व मार्ग सध्या बंद करण्यात आले असून, पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत नागरिकांना त्या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: मुंबईत 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार पारा; रात्री गारवा तर दुपारी उकाडा; थंडी गायब होऊन पावसाची एन्ट्री?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number