10 पदके, 50 प्रमाणपत्रे… तरीही टॉपर विद्यार्थीनीला मिळाली नाही इंटर्नशिप

दिल्ली विद्यापीठातील टॉपर विद्यार्थीनीसोबतही असेच काहीसे घडले, जीने 10 पदके आणि 50 हून अधिक प्रमाणपत्रे मिळवली. पण इंटर्नशिपसाठी तिला संघर्ष करावा लागला.

10 पदके, 50 प्रमाणपत्रे… तरीही टॉपर विद्यार्थीनीला मिळाली नाही इंटर्नशिप
Edited Image

Topper Student Internship Struggle: कठोर परिश्रम आणि समर्पण असूनही संधी मिळत नाही तेव्हा प्रत्येकाला वाईट वाटते. दिल्ली विद्यापीठातील टॉपर विद्यार्थीनीसोबतही असेच काहीसे घडले, जीने 10 पदके आणि 50 हून अधिक प्रमाणपत्रे मिळवली. पण इंटर्नशिपसाठी तिला संघर्ष करावा लागला. दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी बिस्मा फरीदने सोशल मीडियावर (लिंक्डइन) तिची कहाणी शेअर केली आहे, जी सर्वांना विचार करायला लावणारी आहे. 

बिस्मा फरीदच्या लिंक्डइन पोस्टनुसार, बिस्मा यांनी सांगितले की ती दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमध्ये बीए इंग्लिश ऑनर्सच्या पहिल्या वर्षाची टॉपर आहे. तिच्याकडे 50 हून अधिक प्रमाणपत्रे आणि 10 हून अधिक पदके आहेत. तरीही, तिला अद्याप ऑनलाइन इंटर्नशिप मिळालेली नाही. 

बिस्मा फरीदने म्हटलं आहे की, फक्त पुस्तके वाचणे पुरेसे नाही, एखादे कौशल्य शिका आणि त्यात सुधारणा करा, तरच तुम्हाला संधी मिळतील. बिस्मा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि ती देशातील शिक्षण प्रणाली आणि करिअर व्यवस्थेवर मोठा प्रश्न उपस्थित करत आहे.

हेही वाचा – अवकाशातही होतो भूकंप! त्यांचा पृथ्वीवर परिणाम होतो का? जाणून घ्या

शाळा आणि कॉलेजमध्ये सगळे म्हणायचे, अभ्यास करा, चांगले गुण मिळवा, सर्व काही ठीक होईल. पण प्रत्यक्ष जीवनात त्यांना समजले की कंपन्या फक्त मार्क्स पाहत नाहीत, त्यांना अशा लोकांची आवश्यकता असते ज्यांच्याकडे काम करण्याचे कौशल्य आहे आणि जे काहीतरी नवीन करू शकतात.

हेही वाचा – 36 वर्षीय महिलेला अजगराने गिळले; पोट कापून महिलेला काढले बाहेर, जाणून घ्या सविस्तर

बिस्मा यांची पोस्ट वाचल्यानंतर, अनेक विद्यार्थी आणि व्यावसायिकांनीही त्यांचे अनुभव शेअर केले. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘तुम्ही अगदी बरोबर आहात, मीही अशाच परिस्थितीतून गेलो आहे.’ दुसऱ्याने एका यूजरने म्हटलं आहे की, ‘मी अभ्यासात ठीक होतो, पण खरा फायदा व्यावहारिक गोष्टी शिकल्याने झाला.’ 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number