मेष (Aries) : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बऱ्यापैकी धावपळीचा असू शकतो. सकाळपासूनच तुम्हाला कामाचा ताण जाणवेल, परंतु तुमच्या कष्टाचे फळही तुम्हाला मिळू शकेल.
वृषभ (Taurus) : वृषभ राशीचे लोक आज आपले लक्ष प्रामुख्याने घर आणि कुटुंबावर केंद्रित करतील. तुमची एखाद्या नातेवाईकाशी भेट होऊ शकते किंवा फोनवरून त्यांच्याशी संभाषण होऊ शकते.
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांना आज नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळू शकते. त्यांच्या कामात नवीन वाटा खुल्या होऊ शकतात.
कर्क (Cancer) : कर्क राशीच्या लोकांसाठी हा दिवस दिलासादायक ठरू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेले एखादे काम पुढे सरकू शकते.
सिंह (Leo) : सिंह राशीच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळू शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होऊ शकतात.
कन्या (Virgo) : कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कष्टाचा असेल. ज्या कामावर तुम्ही बऱ्याच काळापासून लक्ष केंद्रित केले आहे. त्यात तुम्हाला प्रगती दिसून येऊ शकते.
तुळ (Libra) : तूळ राशीच्या व्यक्तींना आज संयम बाळगावा लागेल. छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे टाळा. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.
वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा दिवस चांगला असू शकतो. अनेक महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात.
धनु (Sagittarius) : धनु राशीच्या लोकांना आज एखाद्या नवीन योजनेवर काम करण्याची संधी मिळू शकते. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो.
मकर (Capricorn) : जर तुमची राशी मकर असेल, तर तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. मात्र, तुम्ही त्या सहजपणे हाताळाल.
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींनी घाई करणे टाळावे. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करावा. जुन्या वादांपासून दूर राहणेच हिताचे ठरेल.
मीन (Pisces) : मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस सकारात्मक संकेत घेऊन येत आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक बाबींबाबत दिलासा मिळू शकतो.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)