मनसेने दणका दिल्यानंतर अखेर तारक मेहता यांची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी माफी मागितली आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचे निर्माता असित मोदी यांनी एक व्हिडिओ शेअर करुन माफी मागण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणी असित मोदी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत नुकताच एक भाग प्रसारित करण्यात आला होता.
यात हिंदी ही मुंबईची भाषा असल्याचं म्हटलं होतं.
यावरुन या सर्व प्रकरणाला तोंड फुटलं होत. याप्रकारानंतर मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळाली.
तसेच महाराष्ट्रातील जनतेनेही सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडिओ शेअर करत मालिकेच्या निर्मात्यांना सवाल केले.
हे संपूर्ण प्रकरण मंगळवारी चांगलेच गाजले. झालेल्या संपूर्ण प्रकरणी मालिकेच्या निर्मात्यांनी माफी मागण्याची मागणी, मनसेकडून करण्यात आली.
यानंतर मालिकेचे निर्माते यांनी ट्विट करत दिलगिरी व्यक्त केली.
मुंबई महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रची राजभाषा मराठीच आहे. यात काही शंका नाही. मी भारतीय आहे. महाराष्ट्रीय आणि गुजराती देखील आहे.
मी सर्व भारतीय भाषेचं सन्मान करतो, असं ट्विट असित मोदी यांनी केलं आहे.
तसेच मालिकेत बापूजीची भूमिका बजावणाऱ्या अमित भट यांनी लेखी निवेदनाद्वारे माफी मागितली.