Time 100 List: टाईम मासिकाच्या टॉप 100 यादीत ट्रम्प आणि युनूसची नावे; एकाही भारतीयाला मिळालं नाही स्थान  

'नेत्यांच्या' यादीतील इतर प्रमुख व्यक्तींमध्ये ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचा समावेश आहे.

Time 100 List: टाईम मासिकाच्या टॉप 100 यादीत ट्रम्प आणि युनूसची नावे; एकाही भारतीयाला मिळालं नाही स्थान  
Edited Image

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांचा टाईम मासिकाच्या 2025 च्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या या वार्षिक यादीत राजकारण, विज्ञान, कला आणि सक्रियता या क्षेत्रांशी संबंधित लोकांचा समावेश आहे. मासिकाची ही वार्षिक यादी 'लीडर्स', 'आयकॉन्स' आणि 'टायटन्स' अशा अनेक श्रेणींमध्ये विभागली गेली आहे.

टाईम मासिकाच्या 2025 च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही – 

गेल्या वर्षी, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे नाव टाईम मासिकाच्या 100 प्रभावशाली सदस्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे अशी अपेक्षा होती की, यावेळीही काही भारतीय सेलिब्रिटींना या यादीत स्थान मिळेल. परंतु सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, 2025 च्या टाइम मासिकाच्या यादीत एकाही भारतीय स्टारचे नाव नाही. 

यंदा टाईम मासिकाच्या यादीत 'या' प्रभावशाली व्यक्तींना मिळाली जागा – 

'नेत्यांच्या' यादीतील इतर प्रमुख व्यक्तींमध्ये ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वर्षी टाईम मासिकाच्या या यादीत एकाही भारतीयाचे नाव समाविष्ट नाही. तथापि, 'लीडर्स' यादीमध्ये व्हर्टेक्स फार्मास्युटिकल्सच्या भारतीय वंशाच्या सीईओ रेश्मा केवलरामणी यांचा समावेश आहे. केवल रमाणी या सार्वजनिक अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या पहिल्या महिला सीईओ बनल्या आहेत.

हेही वाचा – भन्नाट बिझिनेस.. कवट्या, बरगड्या हव्यात का? फेसबुकवर मानवी हाडे विकत होती! अमेरिकन महिलेला अटक

गेल्या वर्षी टाईम मासिकाच्या 2024 च्या यादीत, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि ऑलिंपिक कुस्तीपटू साक्षी मलिक यांचे नाव यादीत समाविष्ट होते. 2025 ची यादी अधिकृतपणे 17 एप्रिल रोजी ऑनलाइन प्रकाशित करण्यात आली. 

हेही वाचा – कोण हा निकिता कॅसप? आई-वडिलांची हत्या करून डोनाल्ड ट्रम्पना मारण्याचा कट; 17 वर्षीय तरुणाला अटक

दरम्यान, इतर श्रेणींमध्ये समाविष्ट असलेल्या इतर प्रसिद्ध व्यक्तींमध्ये सेरेना विल्यम्स, स्नूप डॉग, एलोन मस्क, ग्रेटा गर्विग, एड शीरन आणि रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांच्या पत्नी युलिया नवलनाया यांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर टाईम्सची यादी खूप शक्तिशाली मानली जाते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number