‘कसब्यासाठी टिळक कुटुंबीयांचा विचार व्हावा’

भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजप नक्की कोणाला संधी देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. यातच आता नवीन ट्विस्ट आला असून टिळक कुटुंबातून याविषयी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कसब्यात लढण्यासाठी भाजपमधून इच्छुकांची भाऊगर्दी असताना टिळक कुटुंबातूनच या जागेवर दावा करण्यात आला आहे. कसबा मतदार संघावर गेली […]

‘कसब्यासाठी टिळक कुटुंबीयांचा विचार व्हावा’

भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजप नक्की कोणाला संधी देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. यातच आता नवीन ट्विस्ट आला असून टिळक कुटुंबातून याविषयी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कसब्यात लढण्यासाठी भाजपमधून इच्छुकांची भाऊगर्दी असताना टिळक कुटुंबातूनच या जागेवर दावा करण्यात आला आहे.

कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या मतदार संघात २७ फेब्रवारी रोजी निवडणूक होत आहे. यामुळे भाजप टिळक परिवाराला उमेदवारी देणार का, की चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरुड मतदार संघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देणार, याचा निर्णय होणे अजूनही बाकी आहे. या चर्चदरम्यानच मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शैलेश टिळक म्हणाले की, ही उमेदवारी टिळक परिवाराला मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे. मुक्ता टिळक यांनी अनेक वर्ष या परिसरात चांगलं काम केले आहे. मुक्ता टिळकांचं मतदार संघासाठी काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा आहे. पण कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील, असेही शैलेश टिळक म्हणाले आहेत.

तुम्ही निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर शैलेश टिळक म्हणाले की, जर पक्षाने संधी दिली तर मी ही निवडणूक लढवण्यास तयार आहे. अनेक वर्ष मी मुक्तांसोबत काम केलेलं आहे. माझा मुलगा कुणाल देखील चांगलं काम करत आहे. त्यामुळे परिवारात उमेदवारी मिळावी, अशी आमची इच्छा असली तरी पक्षाचा निर्णय आम्हाला बंधनकारक असेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number