परदेशात वापरलेले मास्क धुवून भारतात विक्रीसाठी!

जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतात ही त्या वायरसमुळे त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर तोंडाला लावण्याच्या मास्कची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून भंगार येत असून त्यामध्ये परदेशी वापरलेले मास्क सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या बाजारात मास्क चा तुटवडा असल्याने परदेशातून वापरलेले मास्क येथील गोदामात धुवून […]

परदेशात वापरलेले मास्क धुवून भारतात विक्रीसाठी!

जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतात ही त्या वायरसमुळे त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर तोंडाला लावण्याच्या मास्कची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून भंगार येत असून त्यामध्ये परदेशी वापरलेले मास्क सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या बाजारात मास्क चा तुटवडा असल्याने परदेशातून वापरलेले मास्क येथील गोदामात धुवून पुन्हा विक्रीसाठी आणण्याचा घाट गोदाम मालकांनी घातला आहे. याचा पर्दाफाश करणारा एक व्हिडिओ शनिवारी रात्री व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस व आरोग्य विभाग यंत्रणा खडबडून जागी झाली .

या व्हायरल व्हिडिओचा तपास ग्रामीण भागात करीत असताना स्थानिक नागरीकांनी व्हिडिओतील गोदाम हे वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंडच्या इमारतीमध्ये असल्याची माहिती दिली. परंतु त्या ठिकाणी रात्री कोणी नसल्याने सकाळी पुन्हा त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी स्थानिक पंचायत समिती सदस्य विकास भोईर ग्रामस्थांसह ‘B – 108’ या गोदामात गेले. तेव्हा तेथील कामगाराने मास्कचा माल पूर्णा ग्रामपंचायत हद्दीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन शेजारील कचरा टाकण्याच्या जागेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट झालं आहे.

पाईपलाईन शेजारी वापरलेल्या मास्क चा भंगार माल फेकून दिल्याची माहिती पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, स्थानिक नारपोली पोलीस ठाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविल्यावर सर्व यंत्रणा खडबडून जाग्या होत त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या मुद्देमलावर कारवाई करायची कोणी या बाबत बरीच खलबते झाल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत घटनास्थळ पंचनामा करून नारपोली पोलिसांकडे तक्रार दिली असून सदरचा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याना आदेश दिले असल्याची माहिती दिली. ठाणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा अजूनही शिरकाव झाला नसला तरी खबरदारी म्हणून आरोग्य विभाग तत्परतेने दक्ष असून नागरीकांनी सुध्दा घाबरून न जाता मास्क विकत घेताना ते नवे असल्याची खात्री करावी. हातरुमालसुध्दा मास्क चे काम करू शकते असा सल्ला दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number