‘हा भाजपाच्या हुकूमशाहीचा पराभव’

कर्नाटकातील निवडणुकांसाठी भाजपाचे सर्वच कार्यकर्ते गेले अनेक दिवस कंबर कसून प्रचार करत होते. परंतु, या निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसने बाजी मारली असून भाजपाचा दारुण प्रभाव झाला आहे. यावर राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ‘हा मोदी-शहांच्या हुकूमशाहीचा पराभव’ असल्याचे वक्तव्य केले आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे? देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची […]

‘हा भाजपाच्या हुकूमशाहीचा पराभव’

कर्नाटकातील निवडणुकांसाठी भाजपाचे सर्वच कार्यकर्ते गेले अनेक दिवस कंबर कसून प्रचार करत होते. परंतु, या निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसने बाजी मारली असून भाजपाचा दारुण प्रभाव झाला आहे. यावर राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ‘हा मोदी-शहांच्या हुकूमशाहीचा पराभव’ असल्याचे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. कर्नाटकच्या जनतेने शहाणपणाने दिलेल्या निकालाबद्दल त्यांचे अभिनंदन, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. २०२४ सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन,’ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number