गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी दरामुळे सामान्य ग्राहक दागिने खरेदीपासून दूर गेले होते. येत्या काळात सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सोन्याच्या दरात अचानक घट झाली असून सोन्याची किंमत सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारी झाली आहे. सध्या लग्नसंमारंभाची लगबग सुरु झालेली आहे. यानिमित्त मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी केली जाते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावांमध्ये तुफान वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता याच सोन्याच्या दरात थोडी घसरण झाल्याचे दिसत आहे.
सोन्याच्या भावात 20 नोव्हेंबरला थोडी घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,14,640 रुपये प्रती 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,24,870 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे. तेच दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,25,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेटचा भाव 1,14,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. बुधवारी 19 नोव्हेंबरला 22 कॅरेटचा भाव 1,25,800 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला होता. तर दुसरीकडे चांदीचे भाव 1,68,100 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. परदेशी बाजारात चांदीचा स्पॉट भाव 52.26 डॉलर प्रति औंस झाला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्या चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. काही ठिकणी तर सोन्याच्या किंमतींनी लाखोंचा टप्पा पार केला. अशा परिस्थितीत ग्राहकांसाठी सोनं चांदी खरेदी कराव की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. केवळ सोन्याच्याच नाही तर चांदीच्या किंमतीत देखील सतत वाढ होत असल्याच पाहायला मिळाल. मात्र आता सोने-चांदीच्या घसरणीमुळे ग्राहकांना दिसाला मिळणार आहे.