‘…तर मुख्यमंत्र्यांविरोधात अवमान याचिका’ – अतुल भातखळकर

राज्यातील १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपच्या १२ आमदारांना मोठा दिलासा मिळाला असून महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता निंलबित आमदार प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना खासदार […]

‘…तर मुख्यमंत्र्यांविरोधात अवमान याचिका’ – अतुल भातखळकर

राज्यातील १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपच्या १२ आमदारांना मोठा दिलासा मिळाला असून महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता निंलबित आमदार प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून न्यायालयाचा अपमान झाला असून राऊत, परबांच्या विधानाला मुख्यमंत्र्यांची संमती आहे का? असा सवाल उपस्थित करत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट केले की, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची शिवसेना नेते टवाळी करीत आहेत. या टवाळगिरीला मुख्यमंत्र्यांची संमंती आहे काय? हे २४ तासांमध्ये स्पष्ट करा, अन्यथा त्यांच्या विरोधात न्यायालायत अवमान याचिका दाखल करावी लागेल.

तसेच, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात संजय राऊत, अनिल परब यांची टिप्पणी न्यायालयाचा अवमान करणारी आहे, असेही अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number