मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी भावी डॉक्टर बनले चोर

मैत्रिणींना भेट देण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील दोन विद्यार्थ्यांना हडपसर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. २२ वर्षीय अनिकेत हनुमंत रोकडे, वैभव संजय जगताप ( वय २२ ) अशी या तरूणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत रोकडे हा बी.ए.एम.एस व वैभव संजय जगताप बी. एस. सी नर्सिंगचे तृतीय वर्षात शिक्षण […]

मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी भावी डॉक्टर बनले चोर

मैत्रिणींना भेट देण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील दोन विद्यार्थ्यांना हडपसर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. २२ वर्षीय अनिकेत हनुमंत रोकडे, वैभव संजय जगताप ( वय २२ ) अशी या तरूणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत रोकडे हा बी.ए.एम.एस व वैभव संजय जगताप बी. एस. सी नर्सिंगचे तृतीय वर्षात शिक्षण घेत होते. काही दिवसांपूर्वी हडपसर येथील नामांकित दुकानात दोन अनोळखी तरुण मास्क लावून आतमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी अंगठ्या दाखवण्यास सांगून त्यापैकी तीन अंगठ्या निवडल्या. दरम्यान दोघांपैकी एक तरूण दुकानातून बाहेर गेला. त्यानंतर दुकानातील कामगार पाठीमागे वळून सोन्याचा ट्रे ठेवत असताना दुसरा तरुण तीन अंगठ्या घेवून दुकानाचे बाहेर पळून गेला. बाहेर आधिच मोटारसायकलवर बसलेल्या साथीदारासह तेथून भरधाव वेगाने धूम ठोकली. ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे आरोपी कैद झाले होते. मात्र तोंडाला मास्क लावल्यामुळे आरोपीची ओळख पटत नव्हती. व्यसनासाठी व मैत्रिणीसोबत चैनीकरीता व गिफ्ट देण्यसाठी वरिल चोऱ्या केल्या असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number